रणबीर आणि कैटरीना एकत्रित साजरा करणार वैलेंटाइंस डे

अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री कैटरीना कैफ वैलेंटाइंस डे एकत्रित साजरा करणार आहेत. काही दिवसापूर्वी दोघांनी एकत्रित न्यू इयर साजरा केले होते. गेल्या वर्षी दोघांनी वैलेंटाइंस डे न्यूयॉर्क मध्ये साजरा केला होता. मात्र हा सर्व प्रकार नंतर सगळ्यांना समजला होता. मात्र यावेळेसपण दोघांनी कोणालाच काही कल्पना येऊ नये अशी योजना तयार केली आहे.

सूत्राने दिलेल्या माहिती नुसार सध्या अभिनेता रणबीर कपूर चंडीगढ़ शहरात आगामी काळात येत असलेल्या त्याच्या ‘बेशर्म’ या सिनेमाची शूटिंग करीत आहे. त्याने १४ फेबुवारी रोजी वैलेंटाइंस डे असल्याने शुटला सुट्टी घेतली आहे. तर दुसरीकडे कैट सुद्धा तिच्या सिनेमाच्या शूटिंगसाठी दुस-या शहरात गेली असल्याचे समजते. मात्र तिने पण १४ फेबुवारी रोजी वैलेंटाइंस डे रोजी शुटला दांडी मारण्याची योजना आखली आहे.

मिळालेल्या महितिनुसार दोघे पण हा खास दिवस सेलिब्रेट करण्यासाठी दोघेपण मुंबईला जाणार आहेत. त्या ठिकाणीच दोघेपण एकमेकांना भेटणार आहेत. पण या भेटीची गुप्तता टायनी पाळली आहे. त्यांचा ठरलेला कार्यक्रम कोणालाच समजणार नाही.

Leave a Comment