एके काळी भारताचा दौरा ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडीज, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या आपापल्या काळातील बलाढ्य संघांनाही खडतर वाटात होता. आगामी काळात भारताच्या दौ-यावर चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत खेळन्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियन संघालाही तीच गोष्ट भेडसावत आहे. याचा धसका ऑस्ट्रेलियन टीमने घेतला आहे. येथील संथ आणि फिरकीला साहाय्य करणा-या या खेळपटयांवर वेगवान व मध्यमगती गोलंदाजी कशी करायची, याचा अभ्यास गेल्या काही दिवसापासून ऑस्ट्रेलियन टीम करीत आहे.
येथील खेळपट्ट्यांवर चेंडूची लकाकी लवकर जाते. याठिकाणी चेंडू लवकरच रफ होतो. त्यामुळे रिव्हर्स स्विंग लवकर होतो. त्याशिवाय हवामान व खेळपट्ट्यांवर चेंडू कसा रिव्हर्स करायचा, याचा अभ्यास सध्या ऑस्ट्रेलियन गोलंदाज करत आहेत. भारताच्या दौ-यावर आलेला वेगवान डावखुरा गोलंदाज मिशेल जॉन्सन याने ‘रिव्हर्स स्विंग थिअरी’ समजून घेण्यासाठी अभिनव मार्ग स्वीकारला आहे. त्याने जहीर खानच्या भारतातील गोलंदाजीच्या ‘स्पेल’च्या कॅसेट्स आणून त्यांचे अवलोकन करण्यास सुरुवात केली असल्याचे समजते.
याबाबत ऑस्ट्रेलियन संघाचे प्रशिक्षक स्टीव्ह रिक्सन म्हणाले, ‘ ऑस्ट्रेलियाची वेगवान गोलंदाजी खेळणे टीम इंडियाला भारतातील खेळपट्ट्यांवरही अवघड जाईल. भारताच्या सीनियर खेळाडूंचे वाढते वय आणि संथ झालेल्या हालचाली, यामुळे ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजांचा उत्साह वाढला आहे.’ त्यासोबतच गेल्या काही दिवसपासून त्यांनी इंग्लंडने भारतात मिळवलेल्या यशाचा अभ्यासही सुरु केला आहे. एवढे मात्र निश्चित की आगामी दौरा हा टीम इंडिया व ऑस्ट्रेलियन संघाच्या दृष्टीने सत्वपरीक्षा पाहणारा आहे.