‘आसूड’चा शुभारंभ १८ फेब्रुवारीला

समाजातील मनोविकृत विचारांना नवी दिशा देणारे, स्त्री ला शिक्षणाचा हक्क मिळवून देणारे क्रांतिसूर्य ज्योतीराव यांचा जीवनपट जाणून घेण्याची, त्यांच्याविषयी वाचन करण्याची आतुरता, उत्सुकता अनेकांना असतेच. त्यांच्यावर अनेक पुस्तके लिहिली गेली. मात्र आता त्यांचा जीवनावर आधारित नाट्यविष्कार प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. ‘आसूड’ या नाटकातून ज्योतीराव फुले यांच्या जीवनावर, त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकला जाणार आहे. या नटकाचा शुभारंभाचा प्रयोग सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत १८ फेब्रुवारी रोजी पुण्यात होणार आहे.

ज्योतीराव फुले यांच्या जीवनावरील या नाटकाचे लेखन डॉ. सोमनाथ मुटकुळे यांनी केले असून बी.पाटील यांनी या कलाकृतीची निर्मिती आणि दिग्दर्शन केले आहे. तर यात दीपक रेगे, सई कोलतेपाटील, स्नेहल पुरंदरे, समीर मालपाठक, सुनील ढमाळ, मंगेश काकड, राजेंद्र आलमखाने, कैलास दाभाडे, तेजस कांबळे, प्रशांत कांबळे, महेश खंदारे आणि गणेश इनामदार यांच्या भूमिका आहेत. संगीत अशोक काळे यांचे तर नेपथ्य मंगेश अडसूळ यांचे आहे.