आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी

कोल्हापूर: राज्यातील विदर्भ परिसरात असलेल्या झाडपट्टी भागात नक्षलवाद फोफावला असताना पोलिसांची नक्षल विरोधी विशेष बटालियन मात्र कोल्हापुरात उभी राहत आहे. गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनीच हे बटालियन कोल्हापूरला पळविल्यच आरोप होत आहे. गडचिरोली भागातील लोक मात्र या पळवापळवीने नाराज आहेत.

नक्षलवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी पोलिसांच्या ३ बटालियन तयार केल्या जात आहेत. त्यातील एक बटालियन नक्षलग्रस्त गोंदीया जिल्ह्यात उभारली जात आहे; तर दुसरी नक्षलवादाचा मागमूसही नसलेल्या साधन कोल्हापूर जिल्ह्यात! या बटलियनमधे ७६५ तरुणांची भारती केली जाणार असून केंद्र शासनाने त्यासाठी ६० कोटी रुपयांचा निधीही दिला आहे. एक बटालियन नक्षलग्रस्त परिसरातून कोल्हापूरला गेल्याने या भागातील युवकांना मिळणारी नोकरीची संधीही हिरावली गेली आहे आणि निधीही तिकडे वळणार आहे.

नक्षलवादाची समस्या आर्थिक बाबी आणि रोजगाराशी निगडीत असल्याचे भान मात्र या स्थानिक राजकारण साधण्याच्या प्रयत्नात सुटत चालल्याचे दिसून येत आहे.

Leave a Comment