नवी दिल्ली: योग गुरू रामदेवबाबा संचलित पतंजली योगपीठ न्यासाची ११ बँक खाती गोठवण्याचा निर्णय प्राप्तिकर विभागाने १४ जानेवारीला घेतला होता. मात्र ही बँक खाती खुली करण्याचा आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिला. त्यामुळे रामदेवबाबांना मोठाच दिलासा मिळाला आहे.
रामदेवबाबांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून दिलासा
न्यासाला २००९- १० या वर्षासाठी करापोटी ३४ कोटी ६८ लाख रुपये रक्कम भरावी लागणार होती. या रकमेतील ७५ लाख रुपयांचा पहिला हप्ता भरता येऊ न शकल्यामुळे न्यासाची बँक खाती गोठवण्याचा निर्णय प्राप्तिकर विभागाने घेतला.
या निर्णयाला आव्हान देणारी याचिका न्यासाकडून दाखल करण्यात आली. त्यावरून न्यायालयाने खाती खुली करण्याचा आदेश दिला.