‘योध्दा’ चिञपटाच्या ध्वनीफितीचे प्रकाशन

पुणे: श्री गणेश मूव्ही क्रिएशन प्रस्तुत; मच्छिंद्र धुमाळ व विजय चौधरी निर्मित ‘योध्दा’ या आगामी चिञपटाच्या ध्वनिफितीचा प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला. या प्रसंगी या चिञपटातील सर्व कलाकार, तंञज्ञ यांच्या बरोबर सामाजिक व राजकीय क्षेञातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. या प्रसंगी चिञपटातील गीतांचे सादरीकरण करण्यात आले. या सर्व गीतांना रसिक प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली.

लहानपणापासूनच मुलांना चांगले संस्कार दिले तर पुढे समाज घडवण्यात मोलाचा वाट उचलता येतो. समाजोपयोगी कार्य करणार्‍यांना गुंडप्रवृत्तीच्या लोकांकडून मारण्यात येते. म्हणून समाज जागृती करून अशा नराधमांना अद्दल घडवण्याशिवाय पर्याय नाही; अशी या चित्रपटाची संकल्पना आहे.

रोमॅटिक, धार्मिक व वास्तव यांचा सुरेख मेळ देवून मानवता हा सर्वश्रेष्ठ धर्म असून त्यासाठी प्रत्येक माणसाने योद्धा व्हायला हवे; असा संदेश चिञपटातून देण्यात आला आहे.

योद्धामध्ये प्रमुख भूमिकेत सौरभ गोखले, शर्मिष्ठा राऊत, नागेश भोसले, देवेंद्र भगत, शिवराज वाळवेकर, प्रिया ब्रेडे, अन्वय बेंद्रे, सुनिल गोडबोले, पूर्वा बर्वे, अथर्व कर्वे आहेत. चिञपटाचे कॅमेरामन चंद्रशेखर अय्यर आहेत तर लेखन व संवाद शिवदर्शन कदम, संगीतकार ओंकार केळकर यांचे तर पटकथा व संवाद मच्छिंद्र धुमाळ यांची आहे. दिग्दर्शन सुशीला प्रसाद यांचे आहे.