बॉलीवुडमध्ये गेल्या काही दिवसापासून नवीन ट्रेंड आला आहे. आता नायकासोबतच अभिनेत्रिपण सिनेमासाठी खूपच मेहनत घेत आहेत. आगामी काळात येत असलेल्या ‘आई मैं और तू’ मध्ये अभिनेत्री प्राची देसाई आता नवीन लूकमध्ये दिसणार आहे. या सिनेमाची शूटिंग गेल्या काही दिवसापासून सुरु आहे. या सिनेमातून प्राचीला तिची जुनी आवड पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे.
जॉन होणार प्राचीचा पियानो टिचर
या सिनेमातील एका सीनसाठी शूटिंगमध्ये प्राचीला पियानो वाजवावा लागणार आहे. त्यामुळे प्राचीने पियानो वाजवण्यास शिकला आहे. यावेळी तिचा पियानो टीचर म्हणून को-स्टार जॉन अब्राहमने तिला मदत केली. जॉनने तिला पियानो वाजवतानाचे बारकावेपण यावेळी शिकवले. त्यामुळे जॉनला सर्वजन सैटवर पियानो टीचर म्हणून बोलावत होते.
सिनेनिर्माता गोल्डी बहलने या रोमांटिक सीनमध्ये पियानो सोबत रोमांस दाखवला आहे. याबाबात गोल्ड बहल म्हणाला, ‘ हा सीन आम्हाला रियल करायचा होता. प्राचीने यापूर्वी कधी पियानो वाजविला नाही. त्यामुळेच त्यांनी या सिनेमासाठी आवडीने पियानो वाजवन्यास शिकला आहे. या सीनच्या शूटिंगसाठी पियानो वाजवन्यास शिकला. त्यासाठी एक पियानो इंस्ट्रक्टर पण ठेवण्यात आला होता. हा सिनेमा १ मार्च रोजी रिलीज होणार आहे.
