राज ठाकरेंनी महायुतीपेक्षा शिवसेनेत जावे: आठवले

सोलापूर: महाराष्ट्र नवनिर्माण सेनाध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीत येण्यापेक्षा शिवसेनेत जावे आणि कार्याध्यक्षपद स्वीकारावे; सध्या शिवसेनेत कार्याध्यक्षपद रिकामेच आहे; असा सल्ला रिपब्लिकन पक्षा (ए)चे अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिला आहे.

काही दिवसांपासून राज आणि उध्दव यांच्या एकत्र येण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. त्यावर आठवलेंनी राज ठाकरेंना पुन्हा एकदा सल्ला दिला आहे. शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदावरून नाराज होऊन राज ठाकरे शिवसेनेबाहेर गेले. आता उध्दव ठाकरे शिवसेनेचे अध्यक्ष झालेत. त्यामुळे कार्याध्यक्षपद रिकामे आहे. ते राज ठाकरेंनी स्वीकारावे; असे रामदास आठवले यांनी सुचवले आहे.

Leave a Comment