हैदराबाद: मध्यावधी निवडणुकांची शक्यता फेटाळून लावत केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार आपला कार्यकाल पूर्ण करेल असा विश्वास केंद्रीय माहिती आणि प्रशासन मंत्री मनीष तिवारी यांनी व्यक्त केला.
हैदराबाद: मध्यावधी निवडणुकांची शक्यता फेटाळून लावत केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार आपला कार्यकाल पूर्ण करेल असा विश्वास केंद्रीय माहिती आणि प्रशासन मंत्री मनीष तिवारी यांनी व्यक्त केला.
सन २००४ मध्ये आम्ही जनतेला दिलेली सर्व आश्वासने संपुआच्या मागील कार्यकाळात पूर्ण केली आहेत. त्याचप्रमाणे या कार्यकाळातही आमच्याकडून सर्व आश्वासनांची पूर्ती होईल; अशी ग्वाही देऊन तिवारी म्हणाले की; जनतेने आम्हाला ५ वर्षासाठी निवडून दिले आहे. आमच्या मित्रपक्षांवर आमचा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे सरकार हा कार्यकाल पूर्ण करेल; असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अफजल गुरूच्या फाशीचा निर्णय पूर्णत: न्यायाव्यावास्थेचा असून त्याच्या फाशीचे कोणी राजकारण करू नये; असेही तिवारी म्हणाले.