वीनाने टाकले विद्याला मागे

बहुचर्चित ‘द डर्टी पिक्चर’ या सिनेमात विद्या बालनने खूपच बोल्ड भूमिका केली आहे. गेल्या काही दिवसापासून ‘द डर्टी पिक्चर’ या सिनेमाचा कन्नड़ रीमेक तयार करण्यात येत आहे. या मध्ये अभिनेत्री विद्या बालनची भुमिका वीना मलिक करीत असून ही भूमिका करीत असतना तिने विद्यासहित सर्वांनाच मागे टाकले आहे.

गेल्या काही दिवसापासून या सिनेमाची शूटिंग सुरु आहे. या सिनेमाची शुटींग सुरु होण्यापूर्वीच वीनाने म्हटले होते की, या सिनेमात तीने बोल्ड सीन करताना कुठलीच कमतरता ठेवणार नाही. वीनाने या सिनेमात हीरो अक्षयसोबत बोल्ड दृश्य केले आहेत. हा सिनेमा पाहिल्यानंतर हे सर्वच सीन अश्लील असल्यासारखे वाटतात. तिने हा सिनेमा बोल्ड वाटावा म्हणून कसलीच कमतरता ठेवली नाही.

या सिनेमाची पहिली झलक पाहिल्यानंतर हा सिनेमा ‘द डर्टी पिक्चर’ पेक्षा खूपच बोल्ड सीन असल्याचे लक्षात येते. या सिनेमात वीनाने तोडके कपडे घालून हीरोसोबत खूपच इंटीमेट सीन्स केले आहेत. हे करीत असतना तिने विद्याला मागे टाकले आहे.