लुंगी लूकमागे शाहरूख,रोहितच – दीपिका

‘चेन्नई एक्सप्रेस’ या सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित झाले असून त्यामध्ये अभिनेत्री दीपिका लुंगी आणि कमीजमध्ये दिसणार आहे. दीपिका पादुकोणच्या या लूकमागे अभिनेता शाहरूख खान आणि दिग्दर्शक रोहित शेट्टीच असल्याचे सांगितले.

या तिच्या नवीन लूकबाबत बोलताना अभिनेत्री दीपिका म्हणाली, ‘ काही तर नवीन करण्याचा प्रयत्न आहे. या सिनेमात काम करीत असताना लुंगी घालण्याचा विचार माझा नव्हता. ही कल्पना शाहरूख आणि रोहितची आहे. याठिकाणी शूट करीत असताना अंधार होत होता. त्यामुळे लवकर शूट पूर्ण करण्यासाठी त्यांनी मला लुंगी दिली. पोस्टरमध्ये कमीज घातला आहे तो शाहरूखचा आहे. या मधील चश्मा फक्त माझा आहे.’

‘रेस-२’ या सिनेमाबाबत दीपिका खूपच उत्साहित आहे. हे वर्ष तिच्या दृष्टीने खूपच महत्वाचे आहे. येत्या सहा महिन्यात तिचे कार्यक्रम फ़ुल्ल असून रजनीकांत सोबतचा तिचा ‘कोचडैयां’ हा सिनेमा रिलीजसाठी तयार आहे. या शिवाय तिच्याकडे ‘ये जवानी है दीवानी’ व ‘रामलीला’ हे दोन सिनेमे आहेत.

Leave a Comment