रेखा होणार राहुल गांधीची शेजारीन

राज्यसभा सदस्य व अभिनेत्री रेखा आता कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची नवीन शेजारीन होणार आहे. गेल्या काही दिवसापासून प्रतीक्षा करीत असलेल्या खासदार रेखाला सरकारने अतिखास व्यक्तीसाठी असलेल्या तुगलक लेनवर टाइप ७ चा ५ नंबर बंगला देण्याचा निर्णय घेतला आहे.

हा बंगला कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या १२ तुगलक लेनच्या बंगल्या शेजारी असणार आहे. ५ नंबरचा हा बंगला सुरुवातीला राज्यसभा सदस्य व प्रसिद्ध क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांना देण्याचे ठरले होते. त्याच्यासाठी या बंगल्याची सुरक्षादेखील वाढविण्यात आली होती. मात्र मीडियामध्ये ही बातमी पसरल्यानंतर तेंडुलकरने हा बंगला घेण्यास नकार दर्शवून होटल मध्ये राहणे पसंत केले होते.

रेखासाठी खासदर बलवंत राय मेहता यांचा लेन १५ नंबरचा बंगला आरक्षित करण्यात आला होता. मात्र याठिकाणी भाजपाचे माजी खासदार राहत असल्याने हा दुसरा बंगला काही दिवसापूर्वीच आरक्षित करण्यात आला आहे.

Leave a Comment