‘रेस-२’ हा सिनेमा १०० कोटीच्या क्लबमध्ये सहभागी झाला आहे. या क्लबमध्ये २० पेक्षा अधिक सिनेमे सहभागी झाली आहेत. १०० कोटीच्या क्लबमध्ये समाविष्ट झालेला अभिनेता सैफ अली खान चा हा पहिला सिनेमा आहे. या सिनेमाने इंडियन बॉक्स ऑफिसवर १०० कोटीपेक्षा अधिक रुपयाची कमाई केली आहे. त्याचे कलेक्शन १४ दिवसातच १०० कोटीपेक्षा अधिक आहे.
२०१३ या वर्षतील हा पहिला सिनेमा आहे. ज्याची कमाई १०० कोटीपेक्षा अधिक आहे. अजुनही हा सिनेमा सुरूच आहे. त्यामुळे हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगला चालण्याची शक्यता आहे. या सिनेमासाठी मोठ्या प्रमाणात पैसा लावण्यात आला आहे. त्यामुळेच हा सिनेमा येत्या काळात हिट सिनेमाच्या लिस्ट मध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे.
‘रेस-२’ या सिनेमात सैफ अली खान आणि अभिनेत्री दीपिका पादुकोनाची प्रमुख भूमिका आहे. त्या दोघांच्या अभिनयामुळेच हा सिनेमा हिट झाला आहे. या सिनेमाने १०० कोटीचा आकडा पार केल्याने सैफ आणि दीपिका दोघेही खुश झाले आहेत.