हाशिम आमला वनडे, कसोटी क्रमवारीत अव्वलस्थानी

दक्षिण आफ्रिकेचा आघाडीचा फलंदाज हाशिम आमला हा क्रिकेटच्या दोन फॉर्मेटमध्ये अव्वलस्थान पटकाविले आहे. हाशिम आमला आयसीसीच्या एकदिवसीय व कसोटी फलंदाजीच्या क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान झाला आहे.

दोन फॉर्मेटमध्ये अव्वलस्थान मिळवनारा तो दुसरा फलंदाज ठरला. यापूर्वी, ऑस्ट्रेलीयाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने अशा प्रकारची उल्लेखनीय कामगिरी केली आहे. क्रिकेटचा किंग आमलाने करिअरमध्ये पहिल्यांदा कसोटीत नंबर वनचे स्थान पटकावले आहे.

अमला हा जोहान्सबर्ग कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियाचा मायकल क्लार्कपेक्षा एका गुणाने मागे होता. त्याने पहिल्या कसोटीत ३७ व नाबाद ७४ धावा काढल्या होत्या. आता त्याने करिअरमधील सर्वोत्कृष्ट ८९५ रेटिंग गुण मिळवले आहेत. कसोटी क्रमवारीत आमलानंतर ऑस्ट्रेलियाचा मायकल क्लार्क व वेस्ट इंडीजचा एस. चंद्रपॉल यांचा क्रमांक लागतो. तर गोलंदाजीत दक्षिण आफ्रिकेचा डेल स्टेन अव्वलस्थानी आहे. त्यानंतर
दक्षिण आफ्रिकेचा फिलेंडर, श्रीलंकेच्या रंगना हेराथ यांचा नंबर लागतो.

Leave a Comment