मिशन इंडिया: सिडलने घेतल्या मॅग्राकडून टिप्स

इंग्लंडने काही दिवसांपूर्वीच टीम इंडियाला मायभूमीत पराभूत केले आहे. तसे पहिले तर भारतात टीम इंडियाला कसोटी मालिकेत पराभूत करणे सोपे नाही. भारतात यश मिळवण्यासाठी कोणत्या उपाययोजना अमलात आणाव्यात याबाबत गुरू ग्लेन मॅग्राने ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांना भारतात रवाना होण्यापूर्वी काही टिप्स सांगितल्या.

तसे पहिले तर भारतातील खेळपट्ट्या फिरकी गोलंदाजांना साथ देणार्‍या आहेत. त्याठीकानी आता राज्य करण्यासाठी पीटर सीडल अण्ड कंपनी तयार झाली आहे. भारतातील महत्त्वाच्या कसोटी मालिकेपूर्वी येथील वातावरण व खेळपट्टी यांचा कसून सराव करता यावा यासाठी ऑस्ट्रेलियाच्या आठ क्रिकेटपटू भारतात दाखल झाले आहेत. यामध्ये पीटर सीडल, जॅकसन बर्ड, स्टीवन स्मिथ, मोसेस हेन्रिक्स, उस्मान ख्वाजा, नॅथन लेयॉन, जेम्स पॅट्टिनसन, एड कॉवन या खेळाडूंचा समावेश होता. त्यानंतर शनिवारी ग्लेन मॅक्सवेल, डेव्हिड वॉर्नर, मॅथ्यू वेड, ऍश्टन ऍगर हे खेळाडू हिंदुस्थानकडे रवाना होतील.

भारतात येणार्‍या ऑस्ट्रेलियाच्या १७ जणांच्या चमूत फक्त चारच जणांना कसोटी खेळण्याचा अनुभव आहे. कर्णधार मायकेल क्लार्क, मिचेल जॉन्सन, शेन वॉटसन व पीटर सीडल या क्रिकेटपटूंनाच येथे यापूर्वी कसोटी खेळता आली आहे. त्यामुळे आगामी कसोटी मालिका ही टीम इंडिया व ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघाची सत्वपरीक्षा पाहणारी ठरणार आहे.

Leave a Comment