मंगेश चव्हाणचा नवा अल्बम ‘धुंदीत मी’

पुणे: ‘व्हॅलेंटाईन्स डे’चे निमित्त साधून मंगेश चव्हाण यांच्या आवाजातला ‘धुंदीत मी’ हा प्रेमगीतांचा नवा अल्बम युनिव्हर्सल म्युझिक कंपनी बाजारात वितरीत करीत आहे. अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असा हा प्रेमगीतांचा अल्बम असून नऊ गाणी, नऊ गीतकार आणि नऊ संगीतकार यांनी सजवलेला आहे. तरूण आणि नव्या दमाचा गायक मंगेश चव्हाण यांचा हा पहिलाच सोलो अल्बम आहे.

या अल्बमचे वैशिष्ट्य म्हणजे ९ गाणी, ९ गीतकार आणि ९ संगीतकार यांच्या साथीने प्रत्यक्षात आली आहे. यातले गीतकार आहेत सोनाली जोशी, हेमंत बर्वे, प्रसाद कुलकर्णी, मंदार चोळकर, मधुकर आरखडे, चंद्रशेखर सानेकर, राजेश बामगुडे, अरुण म्हात्रे, अनुराधा नेरूलकर आणि संगीतकार आहेत अभिजीत राणे, विक्रांत वार्डे, भगवंत नार्वेकर, निलेश मोहरिर, सचिन मालप, सुधांशु, मयुरेश माडगावकर, किशोर मोहिते, अशोक वायंगणकर.

‘धुंदीत मी’ हा अल्बम म्हणजे व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने आपल्या प्रिय व्यक्तिला देण्यासाठी एक संगीतमय आणि प्रेमळ भेट आहे. नऊही संगीतकारांनी प्रत्येक गाण्याला दिलेली उत्तम चाल आणि गायक मंगेश चव्हाण याने दिलेली गोड आवाज हे या अल्बमचे विशेष आहे. मंगेश चव्हाण याचा ‘धुंदीत मी’ हा अल्बम रसिकांना नक्कीच आवडेल; असा कंपनीला विश्वास आहे.

Leave a Comment