भारती एअरटेलला ६५० कोटीचा दंड करण्याची शिफारस

नवी दिल्ली: भारतातील सर्वात मोठी मोबाईल कंपनी असलेल्या भारती एअरटेल कंपनीला परवाना उल्लंघन प्रकरणी तब्बल ६५० कोटी रुपयांचा दंड आकारण्यात यावा; अशी शिफारस दूरसंचार समितीने केली असून ती संमतीसाठी दूरसंचार मंत्रालयाकडे करण्यात आली आहे.

भारती एअरटेल कंपनीने सर्व एसटीडी आणि आयएसडी कॉल्स स्थानिक कॉल्समध्ये रूपांतरित करून दर आकारणी केल्यामुळे भारतीय संचार निगमचे नुकसान झाले आहे. या बेकायदेशीर कृत्याबद्दल कंपनीला प्रति मोबाईल सर्कल ५० कोटी याप्रमाणे १३ सर्कल्ससाठी ६५० कोटी रुपये दंड आकारण्यात यावा; अशी कंपनीची शिफारस आहे.

कंपनीने मात्र समितीच्या आरोपांचा इन्कार केला असून आपले सर्व व्यवहार नियमित आणि कायदेशीर असल्याचा दावा केला आहे.