प्रयत्न, योगदानाविषयी विचार करा- सचिन

गेल्या काही दिवसापासून मास्टर बलास्टर सचिन तेंडुलकर दिल्लीतील युवा खेळाडूना मार्गदर्शन करीत आहे. मेहनत व बांधिलकीमुळे व्यक्ती आपल्या सहका-यांकडून मान मिळवू शकतो. प्रतिस्पर्धीमुळे निराश होऊ नका. आपण फक्त बांधिलकी, प्रयत्न व योगदानाविषयी विचार करायला हवा, असा सल्ला सचिन तेंडुलकरने युवा खेळाडूंना दिला.

सचिन तेंडुलकर दिल्लीतील युवा खेळाडूना सल्ला देत आहे. सचिन म्हणाला, ‘ खेळामुळे निराश होऊ नको, असे मी मुलाला सांगतो. आपण चांगले काम केले तर संघ आपले अनुकरण करतो. या ठिकाणी नेहमी प्रतिस्पर्धी असतात. मेहनत केल्यानंतर नशीब आपोआप पालटते. जीवनात अनेक आव्हाने असतात. मात्र, अपार कष्टामुळे तुम्ही आव्हानांवर विजय मिळवू शकता. असेही त्याने या वेळी सांगितले.

‘ तसे पहिले तर नशिबाचा विचार करू नका. फक्त मेहनतीवर लक्ष्य केंद्रित करा. सातत्यपूर्ण कामगिरी टिकून राहील असे नाही. मात्र, मजबूत व्यक्ती संकटाचा धाडसाने सामना करू शकते,’ असेही सचिन म्हणाला.

Leave a Comment