निम्मी फेसबुक अकाऊण्ट्स बोगस

नवी दिल्ली: सोशल नेटवर्कींगच्या दृष्टीने फेसबुक जगभरात लोकप्रिय संकेतस्थळ ठरले असले तरी त्यावरील अकाऊण्ट्सधारकांच्या माहितीच्या सत्यतेबाबत मात्र खात्री देत येत नाही; कारण फेसबुकवरील पन्नास टक्के अकाऊण्ट्स बोगस असल्याची माहिती खुद्द फेसबुकनेच एका अमेरिकन आयोगाला दिली आहे.

या बोगस अकाउण्ट्स बरोबरंच एकाच व्यक्तीची एकापेक्षा अधिक अकाऊण्ट्स असण्याचे प्रमाणही मोठे असून अनेक जण कार्यालयीन तसेच व्यावसायिक वापरासाठी एक आणि खाजगी वापरासाठी दुसरे; अशी दोन अकाऊण्ट्स वापरंत असल्याचे निरिक्षणही फेसबुकने आपल्या अहवालात नोंदविले आहे.

याच अहवालात सन २०११च्या तुलनेत फेसबुक वापरणार्यांची संख्या सन २०१२ मध्ये २५ टक्क्यांनी वाढली असून भारतीय फेसबुक युजर्सची वाढ वेगाने होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. इंडोनेशिया आणि ब्राझील या देशातही फेसबुकचा प्रसार वेगाने होत आहे.

फ़ेसबुकने दिलेल्या ३१ डिसेंबर २०१२च्या आकडेवारीनुसार जगभरात १. ६ अब्ज फेसबुक युजर्स असून भारतात त्यांची संख्या ७. १ कोटी आहे. एकूण फेसबुक अकाऊण्ट्सपैकी २. २ कोटी अकाऊण्ट्स वापरलीच जात नसल्याचे कंपनीने नमूद केले आहे.

Leave a Comment