अभिषेक नायर झाला खुश

आयपीएलच्या सहाव्या पर्वासाठी झालेल्या बोली प्रक्रियेत अभिषेक हा भारतीय क्रिकेटपटूंमध्ये सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. भारतातातील क्रिकेट स्पर्धेत केलेल्या मेहनतीचे फळ त्याला मिळाले आहे. आयपीएल टीम पुणे वॉरियर्सकडून ३ कोटी ६० लाखाची किंमत मिळाल्याने सध्या अभिषेक नायर अधिक खुश आहे.

याबाबत बोलताना अभिषेक म्हणाला, ‘ चांगली कामगिरी करण्यासाठी घेतलेल्या कष्टाचे चीज झाले. अपेक्षेपेक्षा अधिक मिळाल्यामुळे मी फार आनंदी आहे. त्यामुळे आता येत्या काळात देखील चांगली कामगिरी करावी लागणार आहे. सध्या मी भरपूर सर्व करीत असून मला टीम इंडियामध्ये स्थान मिळवायचे आहे.’

अभिषेकने २००९ मध्ये आंतरराष्‍ट्रीय वनडे क्रिकेटला प्रारंभ केला. त्याने वेस्ट इंडीजविरुद्ध पदार्पणाचा सामना खेळला. तसे त्याला अद्यापपर्यंत राष्‍ट्रीय संघाकडून आंतरराष्‍ट्रीय टी-२० सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. २००५ मध्ये ऑल लराउंडर अभिषेकने मुंबईकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले. त्याने एकूण ५७ प्रथम श्रेणी सामन्यात ५७.६१ च्या सरासरीने एकूण ३ हाजर ८३० धावा काढल्या.

Leave a Comment