रामगांवचा संजय गेले १० महिने राहतोय झाडावर

manontree

वाराणसी दि. ९ –  पक्षी झाडावर राहतात हे आपल्याला माहिती असते. माणसेही झाडावर चढतात पण राहात नाहीत. अर्थात क्वचित पुरासारखी घटना घडली असेल तर माणसे झाडावर आश्रय घेतातही. पण वाराणसीजवळच्या रामगांवचा संजय नावाचा तरूण गेले ९ महिने पेरूच्या झाडावर राहिला आहे. त्यातून त्याला कोणत्याही प्रकारचा विक्रम वगैरे करायचा नाहीये. तर त्यामागे कारण आहे ते बायकोने केलेला व्याभिचार. त्यालाही संजयची हरकत नाहीये. त्याची मागणी एकच आहे, बायकोने आपली माफी मागावी आणि पुन्हा आपल्याकडे नांदायला यावे ही.

हकीकत अशी की संजयचे लग्न झाल्यानंतर तो कामानिमित्त मुंबईत बायकेासह राहात होता.एकदा कामावरून तो परत आला तेव्हा बायको शेजार्यांबरोबर अधिकच सलगीत असल्याचे त्याला दिसले. बायकोचा हा व्याभिचार पाहून संजय दुखावला. त्याने तिला तातडीने गांवी नेले. घरच्यांना सर्व हकीकत सांगितली आणि बायकोने क्षमा मागावी असा आग्रह धरला. पण बायको क्षमा मागायला तयारच होईना. उलट बायकोने मुंबर्सला परत जाण्याचा आग्रह धरला .अखेर तो रागाने पेरूच्या झाडावर चढला. बायको क्षमा मागेल आणि माहेराहून त्याच्याकडे परत येईल तोपर्यंत झाडावरच राहण्याचा निर्णय त्याने जाहीर केला आहे. ९ मार्च २०१२ला संजय झाडावर चढलाय तो अजून तेथेच आहे. त्याने अन्न सोडले आहे पण पेरू मात्र तो खातेाय असे गांवकर्यां चे म्हणणे आहे.

त्याची आई त्याला घरातून पाणी अन्न नेऊन देते. खाली उतर म्हटले की तो आत्महत्त्येची धमकी देतो त्यामुळे घरचेही त्याला झाडावरच राहू देत आहेत. गावकरी मात्र सांगतात की रात्री अपरात्री कोणी पाहात नाही याची खात्री करून संजय खाली उतरतो. कुणाची चाहूल लागलीच तर लगेच झाडावर चढतो. पोलिसांना बोलवायचा सल्लाही अनेकजण देत आहेत पण संजय जीवाचे कांही बरे वाईट क रेल या भीतीने घरचे पोलिसांना बोलवत नाहीत.

एकंदरीत संजय पेरूच्या झाडावर आणि त्याची बायको माहेरी असा प्रकार आहे.