बेस्ट फ्रेंडसाठी प्रत्येकाच्या ह्रदयात वेगळे स्थान असते फिल्म स्टार्स सुद्धा त्यांना विसरू शकत नाही. त्यामुळेच रणबीर कपूरला त्याच्या स्कूल फ्रेंड विकी सिंहने त्याच्या आगामी काळात येत असलेल्या सिनेमासाठी अप्रोच केले आहे. विकी हा सिनेमा डायरेक्ट करणार आहे. रणबीर या सिनेमात एका चोराची भूमिका करणार आहे.
यापूर्वी विकी हा अमेरिकाच्या एका कंपनीत जॉब करीत होता. हा जॉब सोडल्यानंतर तो ‘लक्ष्य’ या सिनामासाठी फरहान अख्तरला असिस्ट करीत होता. त्यानंतर काही काळ त्याने ब्रेक घेतला होता. आत्ता मात्र पुन्हा तो डायरेक्शन फील्ड मध्ये उतरला आहे. ब्रेक घेण्याचे कारण रणबीर हाच असलायचे समजते.
तसे पहिले तर रणबीर आणि सोनम कपूरला त्याने या सिनेमासाठी अप्रोच केले होते. मात्र सोनामशी त्याची चर्चा फिस्कटली आहे. त्यानंतर दीपिका पदुकोन आणि कैतरिना कैफ यांच्याशी पण त्याने संपर्क साधला होता.
या सिनेमात रणबीरचे नाव रॉय असून तो एक एक चोर आहे. अर्जुन रामपाल हीरोचा रोल करीत आहे तर अभिनेत्री जैकलीन फिल्ममेकरची भूमिका करीत आहे. या सिनेमाची शूटिंग रणबीर कपूरच्या ‘बेशरम’ या सिनेमानंतर सुरु होणार आहे.