पासवर्ड ? अहं ! फिजिकल किल्ली

लंडन – माहिती तंत्रज्ञानाच्या युगात युजरनेम आपली ओळख असून पासवर्ड खासगी संपत्ती झाली आहे. परंतु, गेल्या काही वर्षांमध्ये पासवर्ड चोरण्याच्या घटना वाढल्याने नेटिझन्सना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे. त्यामुळे गुगल या कंपनीने पासवर्ड बाद करून ’’फिजिकल की’ ही भन्नाट संकल्पना राबविण्यावर भर दिला आहे. युएसबी कीज, मोबाईल फोन्स आणि आपले दागिनेही ’’फिजिकल की’च्या स्वरूपात लॉग-इन करण्यासाठी वापरता येणार आहेत.

स्मार्ट चीप बसवलेली फिजिकल की कशी असेल याची सविस्तर माहिती गुगलचे सुरक्षा उपाध्यक्ष एरिक ग्रॉस आणि मयंक उपाध्याय आयईईई सिक्युरिटी आणि प्रायव्हसी मॅगझीनच्या ताज्या अंकात देणार आहेत. पासवर्डस् आणि कुकीज सारख्या घटकांवर अवलंबून राहात नेटिझन्सना सुरक्षा पुरविणे भविष्यात शक्य होणार नाही, असे आमचे आणि या उद्योगातील इतरांचेही मत आहे, असे ग्रॉस आणि उपाध्याय यांनी संशोधनावरील पेपरमध्ये लिहिले आहे. ’’फिजिकल की’ वापरण्यासाठी युझर्सना केवळ छोटेसे युएसबी कॉम्प्युटरमध्ये टाकावे लागेल.

वायरलेस चीपवरही दोघे संशोधन करीत असल्याचे समजते. काही मोबाईल फोन्समध्ये वायरलेस चीप यशस्वीपणे बसविण्यात आल्या आहेत. दागिन्यांमध्येही अशा चीप बसविणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तुमच्याजवळ असलेल्या फोनला सेल्युलर कनेक्टिव्हिटी नसतानाही नवीन संगणकात ’’फिजिकल की’च्या माध्यमातून आपली ओळख देणे शक्य होणार आहे.

’युबीकी’ असे नाव असलेल्या छोट्याशा युएसबी कीच्या माध्यमातून लॉग-इन करणे शक्य होणार आहे. पहिल्या पद्धतीनुसार, जेव्हा युजर लॅपटॉपमध्ये ’’फिजिकल की’ टाकतील त्यानंतर सगळ्या गुगल अकाऊंटवर तत्काळ लॉग-इन केले जाईल. त्यासाठी पासवर्ड टाकण्याची गरज राहणार नाही. दुसर्याग पद्धतीनुसार, संगणकावरील टॅपच्या माध्यमातून स्मार्टकार्ड एम्बडेड फिंगर रिंग लॉग-इन करण्याची परवानगी देईल.
की विसरण्याच्या सर्वसाधारण समस्येवर तोडगा काढण्यासाठीही दोघे प्रयत्नशील असून लॉग-इनची सोपी पद्धत शोधून काढण्यावरही संशोधन करीत आहेत. ही पद्धत यशस्वी करण्यासाठी संकेतस्थळांचे सहकार्य मोलाचे राहणार आहे.

इंटरनेट विश्वातील इतर संशोधकांनीही या सारख्या सुविधा पुरविण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, नेटिझन्सचा त्यांना अत्यल्प प्रतिसाद मिळाला. इतर संकेतस्थळांवर प्रयोग करण्यास आम्ही उत्सुक असून जोपर्यंत संशोधनाला व्यापक प्रमाणावर स्वीकारले जात नाही तोपर्यंत हे संशोधन चर्चेच्या पातळीवरच राहील, असेही त्यांनी सांगितले आहे.

Leave a Comment