नागपूर: केवळ २४ तासात घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघा नराधमांनी दोन अल्पवयीन मुलींना खाऊ देण्याचे आमिष दाखवून त्यांच्या वर बलात्कार केला. दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
नागपूर: केवळ २४ तासात घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघा नराधमांनी दोन अल्पवयीन मुलींना खाऊ देण्याचे आमिष दाखवून त्यांच्या वर बलात्कार केला. दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
बुटीबोरी वसाहतीत राहणाऱ्या केवळ ४ वर्षाच्या चिमुरडीला तिच्याच शेजारी राहणाऱ्या शेरुसिंग जाट (वय ४५, मूळ रा. उत्तर प्रदेश) या नराधमाने चॉकलेट देण्याच्या बहाण्याने आपल्या घरात बोलाबून तिच्यावर अमानुष बलात्कार केला. त्यानंतर थोड्या वेळात मुलीला साळसूदपणे तिच्या घरी सोडून तो पसारही झाला. मात्र पोलिसांनी त्याला जेरबंद केले.
दुसर्या घटनेत हिंगणा तालुक्यात सावंगी देवली या गावात राहणारी ७ वर्षीय मुलगी आपल्या मैत्रिणीबरोबर पाणी भरण्यासाठी निघाली असता तिच्या शेजारच्या आकाश दडमल ( वय १९) या तरुणाने मोसंबी देण्याच्या आमिषाने बोलावून घेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यालाही पोलिसांनी अटक केली आहे.