इंटेल डेस्कटॉप मदरबोर्ड उत्पादन थांबविणार

जगातील बलाढ्य चीपमेकर जायंट इंटेल कंपनीने त्यांचे डेस्कटॉप मदरबोर्डचे उत्पादन बंद करण्याचा निर्णय जाहीर केला असून कंपनी आता सर्व लक्ष सीपीयू व्यवसायावरच केंद्रीत करणार असल्याचेही म्हटले आहे.  येत्या तीन वर्षात मदरबोर्डचे उत्पादन टप्प्याटप्प्यात बंद करण्यात येणार आहे.

कंपनीचा शेवटचा मदरबोर्ड असेंब्ली लाईनवर त्यांच्या हस्वेल चीपसेटसाठी बनविला जाणार आहे. त्यानंतर हे उत्पादन बंद होईल. या व्यवसायात फार फायदा नसल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे वरीष्ठ अधिकार्यां चे म्हणणे आहे. त्यामुळे कंपनी आता सीपीयू उत्पादनावरच सर्व लक्ष केंद्रीत करणार आहे. मात्र चांगली बातमी अशीही आहे की कंपनी त्यांचा एकही कामगार कमी करणार नाही तर या विभागातील सर्व कर्मचार्यांयना अन्य विभागात समावून घेणार आहे.

तीन वर्षांनंतर मदरबोर्डचे काय होणार याची काळजी लागली असेल तर त्यापासून दिलासा देणारी बाब अशी की इंटेल रेफरन्स डिझाईन्स विकसित करत राहणार आहे. ही डिझाईन्स त्यांच्या अंतर्गत चाचण्यासाठी विकसित केली जाणार असली तरी ती नंतर अन्य मदरबोर्ड उत्पादक कंपन्यांना हस्तांतरीत करण्यात येणार आहेत.

Leave a Comment