राज्यपातळीवरील नेत्यांशीही राहुल करणार मोकळी चर्चा

नवी दिल्ली दि.७ – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अधिकार्यांशी तीन दिवस मनमोकळी आणि खुल्या वातावरणात चर्चा झाल्यानंतर आता राज्यपातळीवरील आणि शक्य झाल्यास जिल्हा पातळीवरील नेत्यांशीही अशीच चर्चा करण्याचा निश्चय राहुल गांधी यांनी घेतला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

काँग्रेस पक्षातील दोन नंबरचे नेतेपद राहुल गांधी यांना देण्यात आले आहे आणि आगामी निवडणूका त्यांच्या नेतृत्त्वाखाली लढविल्या जाणार आहेत. ते काँग्रेसचे अघोषित पंतप्रधानपदाचेही दावेदार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पक्षात दिल्लीत झालेल्या तीन दिवसांच्या चर्चासत्रात राहुल यांनी पक्षाचे नियम काटेखोरपणे पाळले गेले पाहिजेत तसेच सोपविलेली जबाबदारी योग्य रितीने पार पाडली पाहिजे असे सुनावतानाच पक्षात स्थिर बदल करण्याचे संकेतही दिले आहेत. पक्षाची कार्यपद्धती गंभीरपणे घेतली जावी अशीही अपेक्षा त्यांनी व्यत्त* केली आहे. पक्षात वरची पदे मिळविताना संबंधिताने पक्ष बळकटीसाठी केलेली कामगिरीच विचारात घेतली जाणार असल्याचेही त्यांनी बोलून दाखविले आहे.

या चर्चासत्रात सहभागी सदस्यांना कोणतेही प्रश्न स्पष्ट पणे, निर्भयपणे विचारण्याची मुभा देण्यात आली होती आणि सदस्यंानीही तिकीट वाटपातील गैरव्यवहार, पक्षपातळीवर परस्परातील संवाद, राज्यातील नेत्यांकडून केल्या जात असलेल्या आगळीकी, आपल्या मर्जीतील लोकांचे हित करून बाकीच्यांना डावलण्याची वृत्ती यासंदर्भात अनेक प्रश्न विचारले असेही समजते.

याच धर्तीवर या वर्षात निवडणूका होणार्याज दिल्ली, कर्नाटक, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगढ या राज्यातील नेत्यांशीही राहुल गांधी याचप्रकारे चर्चा करून त्यांच्या अडचणी जाणून घेणार आहेत असे वरीष्ठ नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. पाळीपाळीने विधानसभा निवडणूका होणार्याठ सर्व राज्यातील नेत्यांशी, कार्यकर्त्यांशी राहुल संवाद साधणार असून त्यावेळी ते कदाचित संबंधित राज्यात जातील किवा राज्यातील प्रतिनिधींना दिल्लीला बोलावतील असेही समजते.