नवी दिल्ली दि.६ – रिलायन्स कम्युनिकेशनने मंगळवारपासून त्यांच्या ग्राहकांसाठी ऑनलाईन शॉपिंग सुविधा सुरू केली आहे. मार्जेक एक्स्चेंज या पुरवठादार कंपनीशी त्यासंबंधीचा भागीदारी करार करण्यात आला असून ही आमच्या ग्राहकांसाठी नव वर्षाची भेट आहे असे कंपनीचे सेवा विभाग अध्यक्ष अनुराग पराशर यांनी सांगितले.
ही शॉपिंग सुविधा स्पेशल प्रिव्हीलेज नावाने सुरू करण्यात आली असून यात दररोजच्या गरचेच्या वस्तूंबरोबरच चैनीच्या वस्तू, इलेक्ट्रॅनिक्स, मोबाईल, कपडे, स्वयंपाकाची साधने अशा अनेक वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे. अशा प्रकारची १५ हजार उत्पादने या सेवेमार्फत ग्राहकांना खरेदी करण्याची सोय असून त्यातही त्यांना भरपूर व्हरायटी मिळणार आहे. खरेदी केलेल्या वस्तु कुरिअर सेवेमार्फत ग्राहकांना पोहोचविल्या जाणार आहेत. सध्या देशातील ५०० शहरात ही सेवा दिली जाणार आहे.
ही सेवा घेण्यासाठी रिलायन्स ग्राहकांनी त्यांच्या नंबरवर साईन इन करायचे आहे असे कंपनीने कळविले आहे.