चेन्नई: कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या कर्नाटक जनता पार्टी या पक्षाचे संस्थापक सदस्य पद्मनाभ प्रसन्नकुमार यांनी आपल्या जीविताला येडियुरप्पा यांच्याकडून धोका असल्याची तक्रार केली आहे. त्यामुळे आपल्याला तामिळनाडूत राजकीय आश्रय मिळावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
कर्नाटक जनता पार्टी या पक्षाच्या अध्यक्षपदी येडियुरप्पा यांची निवड करण्यात आली असली तरी आपण निवडणूक आयोगाला पत्र पाठवून त्यांची निवड रद्द करण्यात आल्याचे कळवले आहे. तेव्हापासून येडियुरप्पा आणि त्यांच्या मुलाकडून आपल्याला धमक्या येत आहेत. या पार्श्वभूमीवर आपल्याला सुरक्षा पुरवण्यात यावी अशी मागणी आपण राष्ट्रपती, पंतप्रधान तसेच अन्य नेत्यांकडे केली आहे; असेही त्यांनी सांगितले.
येडियुरप्पा यांना घाबरून आपण सध्या तामिळनाडूत राहात आहोत असेही त्यांनी म्हटले आहे.