मोदी १२ फेब्रुवारीला कुंभमेळ्याला जाणार

अहमदाबाद: गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे येत्या १२ फेब्रुवारीला कुंभमेळ्याला भेट देणार आहेत. कुंभ मेळ्याच्या निमीत्त देशभरातील विविध साधू आणि महंत तेथे जमले असून त्यांच्या मेळ्याव्यात देशाच्या पतंप्रधानपदासाठी मोदी यांच्या नावाचा पुरस्कार करण्याचा घाट विश्‍व हिंदु परिषदेने घातला आहे. त्यादृष्टीने मोदी यांची ही भेट महत्वाची मानली जात आहे.

मोदी यांनाच पतंप्रधानपदाचे उमेद्वार घोषित करावे अशी जाहीर मागणी विश्‍व हिंदु परिषदेचे नेते अशोक सिंघल यांनी या आधीच केली आहे.

देशातील साधु संतांनी देशाचा पंतप्रधान ठरवण्याच्या प्रकाराची संयुक्त जनता दलाने खिल्ली उडवली होती. तथापी त्याला प्रत्युत्तर देताना भाजपचे प्रवक्ते मुख्तार अब्बास नक्वी यांनी देशाच्या पंतप्रधानपदाचा उमेद्वार साधुसंत ठरवणार नाही तर काय हाफिज सईद ठरवणार काय असा सवाल उपस्थित केला होता.

Leave a Comment