
नवी दिल्ली: अलाहबाद येथे भरलेल्या महाकुंभ मेळ्याचा भारतीय जनता पक्षाने राजकीय वापर करू नये असा इशारा समाजवादी पक्षाच्यावतीने देण्यात आला आहे.
नवी दिल्ली: अलाहबाद येथे भरलेल्या महाकुंभ मेळ्याचा भारतीय जनता पक्षाने राजकीय वापर करू नये असा इशारा समाजवादी पक्षाच्यावतीने देण्यात आला आहे.
पक्षाचे नेते रामआश्रय कुशवाह यांनी सांगितले की; भाजपचे नेते महाकुंभ मेळ्यात संतांचे आशिर्वाद घेण्यासाठी जाऊ शकता परंतु त्यांनी तेथे कोणतेही राजकारण करू नये. जर त्यांनी महाकुंभमेळ्याचा राजकारणासाठी वापर करायचा प्रयत्न केला तर राज्यातील आपले सरकार त्यांना रोखेल असा इशाराही त्यांनी दिला.
समाजवादी पक्षाच्या इशार्यावर भारतीय जनता पक्षानेही जोरदार प्रतिक्रीया दिली आहे. पक्षाचे नेते कालराज मिश्र म्हणाले की; महाकुंभ मेळा ही काही समाजवादी पक्षाची खासगी मालमत्ता नाही. तेथे कुणी जायचे आणि कुणी जायचे नाही हे ठरवण्याचा अधिकार राज्य सरकार किंवा समाजवादी पक्षालाही नाही. कुंभमेळा सुखरूप पार पडावा हे पाहण्याची फक्त त्यांची जबाबदारी आहे. त्यांनी बाकीची उठाठेव करू नये असेही त्यांनी समाजवादी पक्षाला सुनावले आहे.