
हैदराबाद: प्रक्षोभक भाषण केल्याच्या आरोपावरून सध्या तुरूंगात असलेले एमआयएम पक्षाचे आमदार अकबरूद्दीन ओवेसी यांच्या आवाजाचे नमुने फौरेन्सिक चाचण्यासाठी घेण्यात आले. त्यांनी केलेल्या प्रक्षोभक भाषणाचे रेकॉर्डिंग पोलिसांकडे उपलब्ध आहे. ते त्यांचेच रेकॉर्डिंग आहे की नाही याची तपासणी करण्यासाठी ही फौरेन्सिक चाचणी घेतली जाणार आहे.