पालघरमध्ये सोनिया- शाहीनची भेट ?

मुंबई दि.५ – काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर पाळण्यात  आलेल्या बंद प्रकरणाबाबत फेसबुकवर टिपण्णी केल्याने अटक होण्याची पाळी आलेली पालघर येथील विद्यार्थीनी शाहीन डाढा यांची भेट होणार का याची जोरदार चर्चा सध्या शहरात सुरू असल्याचे समजते. ठाणे जिल्ह्यातील पालघर येथे उद्या म्हणजे बुधवारी विद्यार्थ्यांसाठीच्या आरोग्य योजनेचे उद्घाटन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या हस्ते होत आहे. त्यावेळी त्या शाहीन आणि तिची मैत्रिण रिनू श्रीवास्तव त्यांना भेटणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

या विषयी बोलताना महाराष्ट्र प्रदेश काँगेस कमिटी कार्यालयातील अधिकारी म्हणाले की सोनियाजी फकत दीड तासासाठी येथे येत आहेत. शाहीनची भेट हा त्यांच्या अजेंड्यावरचा विषय नाही. महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजनेचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांसाठी बाल स्वास्थ मिशन चा कार्यक्रम राबविला आहे आणि त्याचे उद्घाटन सोनियाजी करणार आहेत. या कार्यक्रमाला आरोग्य सेविका, आंगणवाडी सेविका, शालेय विद्यार्थी आणि काँग्रेसचे ५०० कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

गतवर्षी १९ नोव्हेंबरला सेना प्रमुखांच्या निधनानंतर बंद बाबत केलेल्या फेसबुक कॉमेटमुळे शाहीन आणि तिच्या मैत्रिणीला पालघर पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर यावर राज्यात संतापाची लाट उसळली होती व परिणामी ठाण्याचे सुपरिटेंडेंट ऑफ पोलिस रविद्र सेनगांवकर यांना निलंबित करण्यात आले होते.

Leave a Comment