‘धग’साठी उषा जाधवला मानांकन

पुणे: चित्र पदार्पण पुरस्कारासाठी उषा जाधव हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे नामांकन जाहीर झाले आहे. गोवा मराठी चित्रपट महोत्सव, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि यशवंत चित्रपट महोत्सवात गाजलेल्या शिवाजी लोटन पाटील दिग्दर्शित धग चित्रपटातील भूमिकेसाठी हे नामांकन आहे.

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘धग’ चित्रपटाबरोबर उषाचे देखील प्रेक्षकांनी उत्स्फूर्तपणे कौतुक केले होते. त्यानंतर मिळालेले हे नामांकन मनोबल वाढवणारे आहे असे उषाने ‘माझा पेपर’शी बोलताना सांगितले.

‘धग’ला या नामांकनाबरोबर सर्वोत्कृष्ट चित्रपट (जयश्री मोशन पिक्चर्स), सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन (शिवाजी लोटन पाटील), सर्वोत्कृष्ट कथा (शिवाजी लोटन पाटील, नितीन दीक्षित) ही नामांकनेही जाहीर झाली आहेत.

Leave a Comment