‘माझी मुलगी ही सार्‍या देशाची कन्या’

नवी दिल्ली: ‘माझ्या मुलीचा उल्लेख सामूहिक बलात्काराची बळी; असा न करता या भारत देशाची कन्या;’ असा करा; अशी विनंती राजधानीत धावत्या बसमध्ये सामुहिक बलात्काराला बळी पडलेल्या युवतीच्या पित्याने प्रसारमाध्यमांना केली.

बलात्कारात बळी पडलेल्या युवतीच्या वडलांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत आपल्या भावना व्यक्त केल्या. भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्याने ही पत्रकार परिषद आयोजित केली.

हा निर्घृण प्रकार घडल्यानंतर सलग ३ रात्री आपला डोळ्याला डोळा लागला नाही; असे त्यांनी सांगितले. या प्रकरणातील सर्व सहा आरोपींना फासावर लटकावले जावे; एवढीच आपली इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.

या सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणाची सुनावणी विशेष द्रुतगती न्यायालयात सुरू आहे. यापैकी ५ आरोपींनी आपल्यावरील आरोप नाकारले असून सहाव्या अल्पवयीन आरोपीवरील खटला बाल न्यायालयात सुरू आहे.

दरम्यान; या निर्घृण घटनेच्या वेळी पीडीत युवतीबरोबर असलेला तिचा मित्र मण्गळवारी न्यायलयात उपस्थित झाला. त्याने सर्व ५ आरोपींना ओळखले. बुधवारी आरोपींचे वकील त्याची उलटतपासणी घेणार आहेत.

Leave a Comment