सलमानसह तब्बू, सैफ आज कोर्टात हजेरी लावणार

१४ वर्षापूर्वीच्या कांकाणी येथील हरणाची शिकार केल्याप्रकरणी बॉलीवुडचा टायगर सलमान खानसह अभिनेत्री सोनाली बैंद्रे, तब्बू, सैफ अली खान आणि नीलम सोमवारी जोधपुर येथील कोर्टात हजेरी लावणार आहेत. गेल्या वेळेसच्या सुनावणीवेळी कोर्टने त्यांना व्यक्तिगत उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणाशी संबधित अन्य नायकांना पण मुख्य मजिस्ट्रेटने कोर्टात हजेरी लावण्यास सांगितले होते.

सोमवारी याप्रकरनाची पुन्हा सुनावणी होणार आहे. याप्रकरणी वन्य जीव संरक्षण आणि आर्म्स एक्ट नुसार सर्व आरोपिच्या विरुद्ध सोमवारी आरोप निश्चित होणार आहेत. यापूर्वी हरणाची शिकार केल्याप्रकरणी सलमानला अटक पण झाली होती. १९९८ साली ‘हम साथ साथ हैं’ या शूटिंगच्यावेळी जोधपुर जवळील कांकणी गावात १ अक्टूबर ११९८ रोजी रात्रीच्यावेळी हरनाची शिकार केली होती.

यापूर्वीच अभिनेता सलमान खानला फेबुवारी २००६ मध्ये वन्य जीव संरक्षण अधिनियमातर्गत दोषी ठरविण्यात आले आहे. सलमानला या प्रकरणी एक वर्षाची शिक्षा झाली आहे. त्याशिवाय पाच हजार रूपये दंड अशी शिक्षा झाली होती. सलमानने या निर्णयाला सेशन कोर्टत आव्हान दिले होते. त्याशिवाय अभिनेता सैफ अली खान, तब्बू, सोनाली बेंद्रे, नीलम, दुष्यत सिंह आणि दिनेश गावरे यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि वन्यजीवन कायद्यातर्गत आरोप निश्चित करण्यात आले होते.

Leave a Comment