विक्रमवीर अमेरिकन कमांडो ख्रिस केलची हत्या

वोशिण्ग्टन: अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याचा कतमा करणार्‍या पथकातील एका ‘विक्रमवीर’ कमांडोची अमेरिकेच्या निवृत्त नौसैनिकाने गोळ्या घून हत्या केली. सर्वाधिक १५० दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्याचा विक्रम या कमांडोच्या नावावर आहे.

लादेनला ठार करणार्‍या पथकातील नेव्ही सील कमांडो क्रिस केल यांची एडी रे रुथ या निवृत्त नौसैनिकाने हत्या केली. रुथ याला पोलिसांनी अटक केली असून तो मनोरुग्ण असल्याचे पोलिसांनी सांगितले. टेक्सास येथील शूटिंग रेंजवर केल यांची हत्या करण्यात आली.

केल यांनी सन १९९९ ते २००९ या कालावधीत अमेरिकन नौदलात काम केले. त्यांनी नौदलातील आपल्या अनुभवावर आधारित ‘अमेरिकन स्नायपर’ नावाचे पुस्तकही लिहीले. केल हे अमेरिकन सेनादलातील सर्वोत्तम स्नायपर म्हणून प्रसिद्ध होते.

Leave a Comment