मी आणि अक्षय चांगले मित्र- रविना

इंडस्ट्रीजमध्ये ९० च्या दशकात ‘मस्त-मस्त’ जोड़ी म्हणून चर्चेत सदैव असलेली. एवडेच नव्हे तर त्याकाळी प्रत्येक मैगजीनच्या कव्हरवर अक्षय आणि रविनाची जोडीच दिसत होती. काही दिवसातच त्याची लव स्टोरी फीकी पडली. त्यानंतर त्यांचे ब्रेक-अप झाले. त्यांचे ठरलेले लग्न मोडले. त्यावेळी दोघांनी मिळून गुपचूप लग्न केले असल्याची चर्चा ऐकावयास मिळत होती.

या गोष्टीला होऊन किती तरी वर्ष उलटल्यानंतर अक्षय आणि रवीना दोघेपण कितीतरी पुढे सरकले आहेत. सध्या दोघे पण आपले विवाहित जीवन जगत असताना खुश आहेत. आता अभिनेता अक्षय आणि रवीनाला एकेमेकासमोर येण्यास काहीच अडचण वाटत नाही.

नुकत्याच दिलेल्या एका इंटरव्यूमध्ये रवीना म्हणाली, ‘ मी म्हणत नाही की मी आणि अक्षय चांगले दोस्त आहोत. त्याकाळी आमचे लग्न तुटले होते. मात्र यामध्ये कोणती मोठी गोष्ट नाही. माझे हज़्बंड डिवॉर्स्ड होते. पण मी त्यांना मिळाल्याने सध्या आम्ही दोघेपण आनंदित आहोत. त्यामुळे आता मी आणि अक्षय दोस्त असल्यासारखे आहोत.’

मस्त-मस्त गर्ल रवीनाचा हा अंदाज सर्वांनाच आवडण्यासारखाच आहे. गेल्या काही दिवसापासून रविना कमबैक करण्याच्या कामात बिजी आहे. सध्या ती शोभनाच्या ७ नाइट्स सिनेमाच्या शूटिंग मध्ये व्यस्त आहे.