मार्चपर्यंत अमीर करणार राजस्थानमध्ये मुक्काम

अभिनेता आमिर खान आता आगामी काळात दोन महिने राजस्थानमध्ये मुक्काम करणार आहे. त्याठिकाणी अमीर राजकुमार हिरानीच्या ‘पीके’ या सिनेमाची शूटिंग करणार आहे. अभिनेता आमिर केवळ तो करीत असलेला रोल पूर्णपणे समजावून घेण्याच्या उदेशाने याठिकाणी मुक्कम करणार आहे. त्यामुळे आमिरने याठिकाणी मार्चच्या शेवटपर्यंत राहण्याचा निर्णय घेतला आहे.

आमिर याठिकाणी राहण्यासाठी आला असल्याने त्याने सोबत येताना खूप सामान आणले आहे. या ठिकाणी राहण्यासाठी आल्यानंतर काही कमी पडू नये म्हणून त्याने ही सर्व व्यवस्था केली असल्याचे समजते.’ धूम-३’ या सिनेमाच्या शूटिंगवेळी त्याने विदेशात एक घर भाडयाने घेतले होते. याठिकाणी त्याच्यासोबत संपूर्ण परिवार राहण्यासाठी आला होता. आमिरच्या मते होटेलमध्ये राहिल्यानंतर घरी राहिलायासारखी फीलिंग वाटत नाही. त्यामुळे तो शुटींगच्या ठिकाणी घरच बुक करीत असतो.

दिग्दर्शक राजकुमार हिरानी आणि अभिनेता आमिर खान दूस-यावेळी एकत्र येउन सिनेमा तयार करीत आहेत. यापूर्वीचा त्यांचा ‘थ्री इडियट्स’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर एक नवीन रेकॉर्ड केले होते. हे रेकॉर्ड आतापर्यंत कोणत्याच सिनेमाला तोडता आले नाही.

Leave a Comment