भारतीय नागरीकाच्या मृत्यूप्रकरणी चौकशीचे आदेश

इस्लामाबाद: पाकिस्तानच्या लाहोर मधील कारागृहात चंबेलसिंग नावाच्या एका भारतीय कैद्याचा कारागृहातील कर्मचार्‍यांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला होता. गेल्या महिन्यात हे प्रकरण घडले आहे. याच्या चौकशीचा आदेश अंतर्गत सुरक्षामंत्री रहमान मलिक यांनी दिला आहे. स्वत: मलिक यांनी ट्वीटरवर ही माहिती दिली आहे.

लाहोरच्या कोट लाखपत तुरूंगातील दुसरा एक ख्रिश्‍चन कैदी तहसीन खान याने तुरूंग अधिकार्‍यांनी केलेल्या मारहाणीमुळेच चंबेलसिंग याचा १५ जानेवारीला मृत्यू झाल्याचे म्हटले होते. तथापी तुरूंग अधिकार्‍यांनी मात्र हा आरोप फेटाळला असून भारतीय कैद्याचा मृत्यू ह्रदयविकाराने झाल्याचे त्यांनी म्हटले होते.

या मृत्यूबाबत आता रितसर चौकशी केली जाणार आहे. त्याचा मृतदेह अजून जीना हॉस्पीटलच्या शवागारातच असून तो भारताच्या ताब्यात देण्याची मागणी तेथील भारतीय दूतावासाने केली आहे

Leave a Comment