‘डीआरडीओ’ने विकसित केला ‘स्नेक रोबो’

बंगळुरू: नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मानवी मदत अशक्य असलेल्या ठिकाणी मदत कार्य शक्य व्हावे यासाठी लष्कराच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने ‘स्नेक रोबो’ विकसित केला असून चाचण्या घेण्यासाठी तो लष्कराच्या स्वाधीन करण्यात आला आहे.

सापासारखे लवचिक शरीर असलेला हा रोबो अल्युमिनियमपासून बनविण्यात आला आहे. त्याची लांबी दीड मीटर आहे. त्यामध्ये हाय डेफिनेशन केमेरे आणि अल्ट्रासॉनिक सेन्सर्स बसविण्यात आले आहेत.

ढिगार्‍याखाली सापडलेल्या लोकांची छायाचित्र काढून त्याची माहिती मदतकर्त्यांना देण्यासारखी कामे हा रोबो अत्यंत प्रभावीपणे करू शकतो; असा दावा करून डीआरडीओ कृत्रीम बुद्धिमत्ता विभागाचे संचालक सरताज सिंग म्हणले की; मागील वर्षापासून अनेक प्रदर्शनात चांगला प्रतिसाद मिळालेला हा रोबो लष्कराला उपयुक्त असल्याचे चाचणीद्वारे आढळून आले; तर मागणीनुसार त्याचे उत्पादन करण्यात येईल.

Leave a Comment