झीनत अमान पुन्हा चढणार बोहोल्यावर

मुंबई: सत्तरीच्या दशकातील लाखो दिलांची धडकन बनलेल्या अभिनेत्री झीनत अमान हिने आपण लग्न करणार असून आपली मुले या निर्णयावर खूष असल्याचे जाहीर केले आहे. मात्र लग्न कोणाशी करणार हे मात्र तिने गुलदस्त्यात ठेवले आहे. झीनत सध्या ६० वर्षाची आहे.

झीनतला तिच्या चाहत्यांकडून उदंड प्रेम मिळाले. मात्र प्रत्यक्ष वैवाहिक जीवनात तिच्या वाट्याला निराशाच आली. तिने मजहर खानशी लग्न केले. मात्र मजहर आणि त्याच्या कुटुंबियांकडून झीनतला मारहाण आणि छळ होत असल्याचा आरोप झाले. मजहरपासून झीनतला अजान आणि जहान ही मुलेही झाली.

अभिनेता संजय खान याच्या बरोबरही झीनतचे प्रेम जमले. मात्र हे प्रकरण सुरू असताना संजय खानच्या पत्नीने तिला जाहीरपणे मारहाण केली.

मजहरच्या मृत्यूनंतर मी लग्नाचा विचारही मनात आणला नव्हता. आतापर्यंतच्या अनुभवांवरून लग्न म्हणजे मला दु:स्वप्न वाटत होते. मात्र देवाच्या इच्छेने ‘ती व्यक्ती’ माझ्या आयुष्यात आली आणि मला परत तरुण झाल्यासारखे वाटत आहे; अशा भावना झीनत व्यक्त करते.

Leave a Comment