केंद्राला इशारा देण्यासाठी दोन दिवसांचा बंद: येचुरी

कोलकाता: किरकोळ विक्री क्षेत्रात विदेशी गुंतवणुकीला अनुमती देण्याचा निर्णय, वाढती महागाई, आणि केंद्र सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणाच्या विरोधात केंद्र सरकारला अधिक कडक इशारा देण्यासाठी अनेक मध्यवर्ती कामगार संघटनांनी आता दोन दिवसांच्या देशव्यापी बंदची हाक दिली आहे.

या आधी आम्ही एक दिवसाचा बंद पुकारला होता परंतु त्याचा अपेक्षित परिणाम न झाल्याने आता आम्हाला हा दोन दिवसांचा बंद पुकारावा लागला आहे. सीटू, इंटक, आयटक, बीएमएस आणि बॅकींग सेक्टरमधील डाव्या विचारसरणीच्या कामगार संघटनांनी हा बंद पुकारला आहे.येत्या २० आणि २१ फेब्रुवारीला हा बंद होणार आहे असे कम्युनिस्ट नेते सीताराम येचुरी यांनी सांगितले.

Leave a Comment