८० च्या दशकातील प्रसिद्ध बॉलीवुडची ड्रीमगर्ल हेमा मालिनीचे आज सुद्धा इंडस्ट्रीजमध्ये खुप फैंन्स आहेत. या लोकप्रियतेचा फायदा घेत ड्रीमगर्लने एक कोटी रूपयाची मागणी केली आहे. ही तिची ऑफर ऐकून सिनेनिर्मात्याला मात्र चांगलाच धास्तावून गेला आहे. सूत्रोंने दिलेल्या माहितीनुसार हेमाने बॉलीवुडमधील एका सुपरस्टारच्या आईचा रोल प्ले करण्यासाठी एक कोटीची मागणी केली आहे.
ड्रीमगर्ल हेमा मालिनीने मागितले एक कोटी
ड्रीमगर्लने एक कोटी रूपयेची केलेली मागणी खरी आहे असे सांगताना सिनेनिर्माता म्हणाला, ‘ हेमाजी सिनेमात काम करावी म्हणून मी अप्रोच केला होता. सध्या त्यांचे खुप फैंन्स आहेत. त्यामुळे त्यांनी सिनेमात काम करण्यासाठी एक कोटी रूपयाची मागणी केली. हेमा बॉलीवुड ड्रीम गर्लच्या टायटलची हकदार आहे. त्यामुळे १ कोटी दिल्यानंतर ती या सिनेमात काम करण्यास तयार होईल असे वाटते.’
ड्रीम गर्ल हेमामालिनीची ही एक कोटी रुपयाची ऑफर ऐकून या सिने निर्मात्याला मागे सरकावे लागले. या निर्मात्याने त्याच्या जवळ असलेल्या बजटमध्ये १९८० च्या दशकातील दूस-या एका अभिनेत्रीला साइन देखील केले.