कल्पना चावलाच्या मृत्यूची नासाला होती पूर्वकल्पना!

नवी दिल्ली: भारतीय वंशाची अंतराळवीर कल्पना चावला आणि तिचे अंतराळ मोहिमेतील साथीदार जमिनीवर सुरक्षित पोहोचणार नाहीत, हे नासाच्या कंट्रोल रुमला माहित होते, असा मोठा गौप्यस्फोट करण्यात आला आहे. सुमारे दहा वर्षापूर्वी यान दुर्घटनाग्रस्त झाले होते. यामध्ये कल्पना चावलाचा मृत्यू झाला.

कोलंबिया यानाचा प्रोग्रॅम मॅनेजर वेन हेल याने आपल्या ब्लॉगमध्ये याबाबतचा गौप्यस्फोट केला आहे. कोलंबिया अंतराळ यानातले ते सर्व अंतराळवीर कदाचित सुरक्षित धरतीवर उतरू शकले असते. कोलंबिया यानाच्या प्रोग्रॅम मॅनेजरने आपल्या ब्लॉगमध्ये केलेल्या गौप्यस्फोटानंतर हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

फेब्रुवारी 2003 रोजी हे यान धरतीवर उतरण्यास अवघे काही सेंकद उरले असताना कोसळले होते. या दुर्घटनेत सात अंतराळवीरांचा मृत्यू झाला होता. ज्यात भारतीय वंशाची कल्पना चावला हिचाही समावेश होता.

मात्र, कोलंबिया यानाचा प्रोग्रॅम मॅनेजर वेन हेल याने आपल्या ब्लॉगमध्ये सणसणीत गौप्यस्फोट केला आहे. नासाच्या कंट्रोल रुमला या बिघाडाची कल्पना होती. कल्पना चावला आणि तिचे साथीदार धरतीवर सुरक्षित परतू शकणार नाहीत, याची त्यांना कल्पना होती. मात्र कुठलीच पावलं उचलली गेली नाहीत. सगळ्यांनी त्या अंतराळवीरांना वार्‍यावर सोडले असे वेन हेलने आपल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे.

Leave a Comment