उत्तर इराकमध्ये बॉम्बस्फोटात ३० ठार; ७० हून अधिक जखमी

किर्कूक (इराक) – पोलिस मुख्यालयाचा ताबा घेण्याच्या उद्देशाने आलेल्या हल्लेखोरांनी एका कारमध्ये दोन बॉम्बस्फोट घडवून आणल्याने उत्तर इराकमधील किर्कूक शहरात ३० ठार, तर ७० जण गंभीर जखमी झाले आहेत.

अंगावर स्फोटके बांधलेल्या आत्माघतकी हल्लेखोरांनी प्रथम प्रवेशव्दारावर स्वत:ला उडवले. अन्य शस्त्रधारी हल्लेखोरांचा मुख्यालयात घुसण्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी प्रवेशव्दारावर स्फोट घडवला. पण हल्लेखोरांचा प्रयत्न फसल्याचे पोलिसांनी सांगितले. हल्ल्यात बळी पडलेल्या तसेच जखमी झालेल्या नागरिकांना लगेचच रुग्णालये आणि वैद्यकीय केंद्रांमध्ये नेण्यात आले.

गंभीर जखमींची संख्या पाहता मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. हिंसाचार आणि मोठे बॉम्बस्फोट अजूनही इराकमधील मोठया शहरातील सामान्य घटना आहेत.

Leave a Comment