लेक व्हिलान्सचा यशस्वी वेध

अंटार्टिका खंडातील घनदाट बर्फाखाली सुमारे १ किमी खोल असलेल्या लेक व्हिलान्सपर्यंत खोदाई करण्यात अमेरिकी संशोधकांना यश मिळाले असल्याचे वृत्त आहे. या सरोवरातील पाण्यापर्यंत पोहोचण्यासाठी या संशोधकांनी सेन्सर लावलेल्या ड्रीलचा यशस्वी वापर केला असून सरोवरातील पाण्यापर्यंत पोहोचल्याचे संकेत सेन्सरकडून मिळाल्यानंतर या छिद्रातून कॅमेरा आत सोडण्यात आला आहे.

अंटार्टिका खंडावरच्या बर्फाखाली दबली गेलेली सरोवरे शोधून काढण्याचा प्रकल्प गेली अनेक वर्षे सुरू आहेत. अशा अनेक प्रकल्पातील व्हिलान्स हा एक प्रकल्प आहे. ब्रिटीश टीमने लेक एल्सवर्थ पर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न केले होते मात्र कांही तांत्रिक अडचणींमुळे त्यांना तो प्रयत्न थाबवावा लागला होता. रशियन संशोधकांनी लेक व्हिस्टॉक येथून पाण्याचे नुमने घेण्यात यश मिळविले होते मात्र त्याचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले नाहीत. अमेरिकी संशोधकांनी वेधलेले लेक व्हिलान्स पश्चिम अंटार्टिकातील रॉस सीच्या किनार्या.वर आहे. त्याची व्याप्ती ६० चौरस किलोमीटर इतकी असून वरच्या बर्फाचा थर ८०१ मीटर इतका होता असे सांगण्यात येत आहे.

या ठिकाणी गरम पाण्याचे ड्रील वापरून ३० सेंमी जाडीचे छिद्र पाडण्यात आले. हे छिद्र आता सुरक्षित करण्यात आले आहे .त्यामुळे त्यातून आत अन्य उपकरणे, कॅमेरे , सेन्सर्स पाठविणे शक्य होणार आहे. आतील पाण्याचे गुणधर्म तपासले जाणार असल्याचे संशोधकांचे म्हणणे असून अंटार्टिका खंडात आत्तापर्यंत ३०० मोठ्या पाणस्थळांचा शोध लागला असल्याचेही त्यांनी सांगितले.

Leave a Comment