गेल्या काही दिवसापासून अभिनेत्री अमीषा पटेल हिने सिनेसृष्टी सोडली आहे अशा बातम्या ऐकावयास मिळत आहेत. त्याबाबत बोलताना अमिषा म्हणाली की मी अजून तरी सिनेसृष्टी सोडली नाही. मी अजून तरी नेहमीच सिनेमात काम करत असल्याचे ही त्यांनी सांगितले.
मी सिनेसृष्टी सोडली नाही – अमिषा
याबाबत अधिक बोलताना अभिनेत्री अमीषा पटेल म्हणाली, ‘ मी सिनेमात पुनरागमन करीत आहे. अशा स्वरुपाचे शब्द माझ्या बाबतीत वापरले जात आहेत. मात्र ते पूर्णपणे चुकीचे आहे. लग्न केल्यानंतर अथवा आई झाल्यानंतर एकादी अभिनेत्री जेंव्हा पुन्हा सिनेमात काम करते. त्यावेळी ती पुनरागमन करते असे म्हटले जाते. मी कधीच बॉलीवुड सोडले नाही ‘रेस-२’ या सिनेमातून माझे पुनरागमन झाले नाही. यापूर्वी माझा ‘चतुर सिंह-२ स्टार्स’ हा सिनेमा आला होता. हा सिनेमा काहीसा व्यवसाय करू शकला नाही. त्यामुळे प्रेक्षक मला विसरले आहेत असे वाटते .’
अमीषाच्या मते बॉलीवुडमध्ये मोठे राजकारण चालते. मी ‘कहो ना प्यार है’ या सिनेमातून चांगली सुरुवात केली होती. मात्र अभिनेता रितिक रोशनलाच त्याचे सारे क्ष्रेय मिळाले. मात्र मी नेहमीच सकारात्मक विचार करते आहे. सिनेमा मिळवण्यासाठी ती कधीच राजकारण करीत नाही. गेल्या एकही दिवसापासून ती सिनेनिर्मितीवर भर देत आहे. तिच्या एक सिनेमाचे दिग्दर्शन डेविड धवन आणि दुस-या सिनेमाचे दिग्दर्शन प्रियदर्शन करीत आहे.
