चिखलदरा – महाभारतातील घटनांचे ठिकाण

महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा हे पठारी थंड हवेचे ठिकाण ऐतिहासिक महत्त्वाचे स्थळ आहे. वसुदेव कृष्णाने रूक्मिणीला पळवून नेले ते येथूनच. भीमाने द्रौपदीला स्पर्श करण्याचा प्रयत्न केलेल्या किचकाचा वध केला तो ही येथेच. इतकेच नव्हे तर महाराष्ट्रातील हे असे एकमेव पर्यटन स्थळ आहे ,जेथे कॉफी लागवड केली गेली आहे.
Chikhaldara Chikhaldara1 Chikhaldara2 Chikhaldara3
महाभारतात उल्लेख असलेल्या किचकवधाचे नाट्य येथेच घडले असा समज आहे. भीमाने राजा किचकाला ठार मारून येथील दरीत फेकले होते. वास्तविक त्यावरून या ठिकाणाला किचकदरा असे नांव पडले. मात्र इंग्रजीत स्पेलिंग करताना ते चिखलदरा असे केले गेले आणि चिखलदरा याच नावाने हे ठिकाण आता ओळखले जाते. हैद्राबाद रेजिमेंटमधील कॅप्टन रॉबिनसन याने हे ठिकाण पाहिले ते १८२३ साली. डोंगरावरून दिसणारी मनोहारी हिरवाई आणि सप्टेंबर आक्टोबरमध्ये सुरू होणारी पानगळ त्याला इंग्लंडची आठवण करून देत असे.

किचकाचा वध केल्यानंतर रक्ताने भरलेले हात भीमाने ज्या कुंडात धुतले ते भीमकुंड, बीर धरण, पंचबोल पॉइंट, वैराट देवी, सूर्यास्त पॉइंट, महादेव मंदिर, काळापाणी धरण, शंकर सरोवर, म्युझियम, धबधबा, धारकुरी, बाकदरी, मुक्तदरी ही येथील पाहण्यासारखी स्थळे. पठारावरून दिसणार्याा धुक्याने लपेटलेल्या खोल दर्या,, हिरवीगार कुरणे, आणि विविध प्रकारची वृक्षसंपदा असलेले हे स्थळ उन्हाळ्यातील मस्त मुक्कामाचे ठिकाण आहे. उन्हाच्या झळांपासून आणि उकाड्यापासून सुटका हवी असेल तर चिखलदर्याहला पर्याय नाही. ढगातून चालण्याचा प्रत्यक्ष अनुभव येथे आपण घेऊ शकतो.

जवळच असलेल्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पालाही भेट द्यायला हवीच. येथे ८२ वाघ आहेत असे आकडेवारी सांगते. शिवाय अभयारण्यात चित्ते, अस्वले, सांबर, रानकुत्री यांचेही दर्शन घडते. हरिकेन पॉईंट, प्रॉस्पेक्ट पॉईंट पाहायचा तो नैसर्गाचे वैविध्य अनुभवण्यासाठी. मुक्तगिरीला जैन मंदिर आहे. वास्तविक हे ठिकाण मध्यप्रदेशात येते मात्र परतवाड्यापासून ते जवळ असल्याचे याच ट्रीपमध्ये हे ठिकाणही पाहता येते. डोंगर उतारावर बांधला गेलेला हा ५२ मंदिरांचा समूह असून ही सर्व मंदिरे पायर्यां नी जोडली गेलेली आहेत. त्याच्या पार्श्वभूमीवर असलेला धबधबा त्यांना आणखी सुंदर बनवितो.

साधारण ५ किमीवर असलेल्या बाकदरी येथे मोठा धबधबा आहे. त्याच्या अलिकडे काकलकुंड आहे.धारखुरा हे परतवाड्यापासून १० किमीवर असलेले ठिकाण आहे. मात्र येथे जाणे महाबिकट आहे. ५ किमीची वाट पायी तुडवत जावे लागते मात्र हा त्रास घेतलात तर तेथे असलेले फॉसिल्स संग्रहालय मात्र अवश्य पाहावे असे. तसेच पठारावरच असलेला १२ व्या शतकातला मातीत बांधलेला गाविलगड हा देवगिरीच्या यादवांचा गडही पाहावा. मात्र गड शाबूत नाही तर भग्नावस्थेतच आहे.

Leave a Comment