शहीद-करीनाची बॉक्स ऑफिसवर टक्कर

आगामी काळात अभिनेता शाहिद कपूरचा ‘फटा पोस्टर निकला हीरो’ आणि अभिनेत्री करीना कपूरचा ‘सत्याग्रह’ हा सिनेमा एकाच दिवशी रिलीज होणार आहे. विशेष बाब ही आहे की, शाहिद आणि करीना काही दिवसापूर्वी गर्लफ्रेंड आणि ब्वॉयफ्रेंड होते. ऑगस्ट महिन्यात या दोघांचे सिनेमे एकमेकासमोर येत आहेत.

तसे पहिले तर अभिनेता शाहिदच्या सिनेमाच्या रिलीज डेटची घोषणा खुप पूर्वी झाली आहे. आणि करीनाच्या सिनेमाची घोषणा एक आठवड्यापूर्वी झाली आहे. दोन्ही सिनेमे स्वतंत्र्य दिनी रिलीज होणार आहेत. त्यासोबतच निर्माता सुभाष घईने त्याचा ‘कांची’ हा सिनेमा देखील याचा दिवशी रिलीज करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे एकाच दिवशी तीन-तीन सिनेमा रिलीज होणार आहेत.

दिग्दर्शक प्रकाश झा यांनी त्यांचा बहुचर्चित ‘सत्याग्रह’ हा सिनेमा एक आठवडा पुढे ढकलला आहे. त्यमुळेच करीना आणि शाहिदचा सिनेमा आमने-सामने आला आहे. ऑगस्ट महिना येण्यास अजून बरचसा कालावधी आहे. तोपर्यंत अजून यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकाद्या सिनेमाची रिलीज डेट अजून पुढे-मागे होऊ शकते .

Leave a Comment