दोषी आढळल्यास सलमानला होणार दहा वर्षाची शिक्षा

गेल्या काही दिवसापासून बॉलीवुडचा ‘दबंग’ सलमान खान समोरील अडचणी वाढत चालल्या आहेत. मुंबईच्या बांद्रा कोर्टाने सलमान खानवर ११ वर्षापूर्वीच्या हिट एंड रन प्रकरणी त्याच्यावर कलम ३०४(२) नुसार कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे याप्रकरणी जर सलमान दोषी आढळला तर त्याला दहा वर्षाची शिक्षा होण्याची शक्यता आहे.

या प्रकरणी कारवाई करण्यास मुंबई पोलिसाने उशिर केला असल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणी माजी आयपीएस अधिकारी वाय. के. सिंह यांची पत्नी आभा सिंहने कोर्टात याचिका दाखल करून सलमानची बाजू घेत पोलिस मुद्दाम या केसला उशीर करीत असल्याचा आरोप केला आहे.

बांद्रा कोर्टच्या आदेशानुसार आता सलमानवर कलम ३०४-अ ऐवजी ३०४ (२) कलमानुसार केस चालणार आहे. याप्रकरणी दोषी आढळल्यास त्याला दहा वर्षाची शिक्षा होण्याची शक्यता आहे. बांद्रा कोर्टला या कलमानुसार सुनवाणी करण्याचे अधिकार नाहीत. त्यामुळे या कोर्टाने ही केस मुंबई सेशन्स कोर्टाकडे ट्रान्सफर केली आहे. सलमान खानला आता ११ मार्च रोजी मुंबई सेशंस कोर्टापुढे हजर व्हावे लागणार आहे. सलमानवर सप्टेंबर २००२ मध्ये बांद्रा येथील फुटपाथवर झोपलेल्या मजुराच्या अंगावर क्रूजर गाड़ी घातल्याचा आरोप आहे. या घटनेत एका मजुराचा मृत्यू झाला होता, तर तिघे जखमी झाले होते. बांद्रा कोर्टाच्या आदेशानंतर सलमानला मुंबई हायकोर्टात धाव घ्यावी लागणार आहे.

Leave a Comment